Offer
मराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती
ISBN:
9789382364023
Status:
Available
Price:
200/- 160/-
Author/Editor:
कौतिकराव ठाले पाटील
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
175
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
मराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती प्राचार्य ठाले पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पुस्तकात समाविष्ट झालेल्या मजकुरातून प्रकट झाले आहेत. त्यामुळे हे लेखन वाचनीय झाले आहे. तथापि, याहूनही महत्त्वाचा असा विशेष म्हणजे त्याला असलेले सामाजिक व संस्थात्मक संदर्भ होत. या दृष्टिकोणातून पाहता हे पुस्तक म्हणजे मराठी भाषिक आणि साहित्यिक संस्कृतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भाषिक आणि साहित्यिक संस्कृतीचे सुरक्षित अंतरावरून आणि अकादमिक दृष्टिकोणातून निरीक्षण आणि विश्लेषण करण्याच्या बुद्धीने तो निर्माण झालेला नाही. भाषिक आणि साहित्यिक संस्कृतीच्या कार्यक्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवांच्या शब्दांकनामधून व भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात वेळोवेळी घ्यायला लागलेल्या भूमिकेमधून तो निर्माण झाला आहे. त्याच्या या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे दस्तऐवज म्हणून या पुस्तकाचे मूल्य अधिकच वाढले आहे. (प्रस्तावनेमधून) - हरिश्चंद्र थोरात
पुस्तकाची झलक