Offer
अस्वस्थ वर्तमान
ISBN:
9789382364085
Status:
Available
Price:
250/- 225/-
Author/Editor:
आनंद विनायक जातेगावकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
223
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
अस्वस्थ वर्तमान अशोक नारायण गोरे आणि त्याच्यासारखी काही पात्रे या लेखनात आहेत, घटना आहेत, त्यामुळे या लेखनाचा कादंबरी या साहित्यप्रकारातच समावेश करावा लागेल असे वाटत असले तरी विवेचनपर गद्याचा या संहितेवर फार मोठा प्रभाव आहे. फिक्शन आणि नॉनफिक्शन यांच्या सीमारेषेवर हे लेखन उभे आहे. आपल्या या लेखनाचा अत्यंत वेधक आणि महत्त्वाचा विशेष म्हणजे आपण विविध प्रकारच्या संहितांना त्यात दिलेले महत्त्व होय. अगदी प्रारंभापासून वेगवेगळ्या संहिता अशोक नारायण गोरेच्या मनासमोर उभ्या राहतात. या संहितांचे विश्लेषण करता करता महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साकार होऊ लागतो. या संहितांच्या आणि त्यांच्या सूक्ष्म वाचनांच्या रूपाने भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातला अनुबंध जोडला जातो. भूतकाळातील संहिता व त्यांचे वर्तमानातील अर्थनिर्णयन, भूतकाळात त्या संहितांना असलेले सांस्कृतिक महत्त्व आणि अस्वस्थ वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे होणारे विचलन या दोहोंचा मेळ घालून जाणिवेचा होणारा प्रवास आपण अधोरेखित केला आहे. स्थिर संहितांना काळाच्या पातळीवर चल करून, आपण कोठे येऊन पोहोचलो आहोत याचे भान आपण विलक्षण रीतीने व्यक्त केले आहे. आजपर्यंतच्या कोठल्याही मराठी कादंबरीत भूतकालीन संहितांचा एवढा अर्थपूर्ण उपयोग करून घेतल्याचे मी पाहिले नव्हते. अर्थ लावण्याच्या पातळीवर ढोबळपणा राहिला असता तर संहितांच्या उपयोगांचा हा डोलारा कोसळला असता. आपल्या अभिजात संवेदनशीलतेच्या साहाय्याने आपण या संहितांचे काळोखात असलेले कानेकोपरे प्रकाशात आणले आहेत व त्यामुळेच भूतकालीन संहितांशी मांडलेला हा खेळ अत्यंत प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. हरिश्चंद्र थोरात (लेखकाला लिहिलेल्या पत्रामधून)
पुस्तकाची झलक