Offer
के. सच्चिदानंदन यांची कविता
ISBN:
9789382364122
Status:
Available
Price:
150/- 113/-
Author/Editor:
चंद्रकांत पाटील
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
108
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
के. सच्चिदानंदन यांची कविता के. सच्चिदानंदन यांची कविता एकाच वेळी भूत, वर्तमान, भविष्याचा वेध घेते. तीव्र अनुभव आणि प्रभावी भाषा, उच्च प्रतीची कल्पनाशीलता यांतून त्यांच्या कवितेचे सर्जन होते. त्यांच्यासाठी व्यक्ती आणि समष्टीतील सीमारेषा पुसट झालेल्या असतात. ते जसे मनात खोलवर डोकावतात तसेच विराट व्यापक दृष्टीतून समाजाकडे बघतात. त्यांची कविता कुठल्याही एका विचारधारेशी, संप्रदायाशी, समाज-संस्कृती-धर्म-राजकारण यांच्या सिद्धांताशी बांधलेली नाही. उदारमतवादी, मानवतावादी, बहुसांस्कृतिक, प्रखर नैतिक जाणीव असलेली, सर्व धर्मांशी सहिष्णुतेनेच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन आदरभावनेने ओतप्रोत अशी आधुनिकता आणि आधुनिकोतरता यांच्याशी नाते सांगणारी त्यांची कविता खऱया अर्थाने समकालीन भारतीय कवितेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. 2011 च्या नोबेल पुरस्काराच्या (साहित्य) यादीत के. सच्चिदानंदन यांना दहावे मानांकन मिळाले होते.
पुस्तकाची झलक