Offer
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
ISBN:
9789382364184
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
भाऊ पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
100
Language:
मराठी
Edition:
चौथी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर 1967 साली प्रथम प्रकाशित झालेल्या या कादंबरीमध्ये साठोत्तरी कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये एकवटली आहेत. प्रस्थापित व पारंपरिक मूल्यांची हास्यास्पदता, समाज आणि व्यक्ती यांच्यातील ताणतणाव, दैनंदिन आयुष्य जगताना अटळ ठरणारे नैतिक निर्णय, आयुष्याच्या निरर्थकतेचा वारंवार येणारा प्रत्यय व त्यातून निर्माण होणारे तुटलेपण अशी अनेक आशयसूत्रे या कादंबरीमध्ये एकवटली आहेत. मी जन्माला का आलो आणि माझ्या आयुष्याचा उपयोग काय असे प्रश्न पडलेला आणि प्रचलित मूल्यव्यवस्थेतील दंभामुळे मुळापासून अस्वस्थ झालेला या कादंबरीचा नायक एकीकडे खास मराठी मध्यमवर्गाच्या चौकटी उद्ध्वस्त करतो तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील अस्तित्वलक्ष्यी आशयसूत्रांशी नाते जोडतो. काही संहिता बदललेल्या परिस्थितीबरोबर नव्या अर्थनिर्णयनाची मागणी करत असतात. अशा वेळी आतापर्यंत न जाणवलेली त्यांची काही अंगे पुढे आलेली असतात. बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर चा समावेश अशा मोजक्या संहितांमध्ये करावा लागतो. हरिश्चंद्र थोरात.
पुस्तकाची झलक