Offer
ग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न
ISBN:
9789382364207
Status:
Available
Price:
110/- 99/-
Author/Editor:
वसंत पाटणकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
88
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
ग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न सांकल्पनिक पातळीवरचा सहज वावर, सूक्ष्म पातळीवरील विश्लेषणाची क्षमता आणि खोलवरचा व्यासंग हे डॉ. वसंत पाटणकर यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या समीक्षेचे महत्त्वाचे विशेष आहेत. ‘ग्रेसची कविताः काही निरीक्षणे, अनेक प्रश्न’मधील लेखनातून पुन्हा एकदा या विशेषांचा प्रत्यय येतो. या लेखनामधून डॉ. पाटणकरांनी अर्थनिर्णयनप्रक्रियेसमोर आव्हान म्हणून उभ्या राहणाऱया ग्रेस यांच्या कवितेच्या स्वरूपाचा अर्थपूर्ण वेध घेतला आहे. या कवितेतील आशयसूत्रे, तिच्यातील अनुभवाचे स्वरूप, तिच्या रूपबंधाची अनोखी उभारणी, तिच्यातून आविष्कृत होणाऱया विश्वाचे स्वरूप अशा विविध घटकांमधील परस्परसंबंध डॉ. पाटणकरांनी मर्मज्ञतेने स्पष्ट केले आहेत. ‘ग्रेसची कविताः काही निरीक्षणे, अनेक प्रश्न’मधले हे लेखन वाचकाच्या वाचनप्रक्रियेला अग्रक्रम देते, लोकप्रिय आवाहकतेची तटस्थ चिकित्सा करते आणि ग्रेस यांच्या कवितेतील अनवटपणाचा रहस्यभेदही करते. आकलनाचे औदार्य आणि भेदक परखडपणा या दोहोंचा नेमका तोल येथे सांभाळला गेला आहे. एखाद्या कवीच्या समग्र कवितेचा अभ्यास कसा करावा याचा हा वस्तुपाठच आहे. - हरिश्चंद्र थोरात.
पुस्तकाची झलक