Offer
हू किल्ड करकरे
ISBN:
9789382364030
Status:
Available
Price:
380/- 342/-
Author/Editor:
एस. एम. मुश्रीफ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
344
Language:
मराठी
Edition:
नववी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
हू किल्ड करकरे देशांतर्गत अथवा बाहेरील शक्तीमुळे होणारा राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद या दोन्ही गेष्टींना भारतात फार जुना इतिहास आहे. भारतीय मुसलमान आतंकवादी आहेत ही भावना 1990च्या दशकात जहाल हिंदुवादी शक्तींच्या उदयानंतर आकार घेऊ लागली आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तर तिला घोषवाक्याचे स्वरूप आले होते. स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणारी माध्यमे सुरक्षा संस्थांची स्टेनोग्राफर म्हणून काम करू लागल्यानंतर तर, दहशतवादी मुस्लीम ही एक सर्वमान्य गोष्ट बनली. इतकी, की अनेक मुसलमानांचाही या खोट्या प्रचारावर विश्वास बसू लागला. पोलीस खात्यात ज्यांनी उल्लेखनीय सेवा केली आणि तेलगी प्रकरणासारखे घोटाळे उघडकीस आणले, त्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी आपला सामाजिक क्षेत्रातील आणि पोलीस खात्यातील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे व प्रसिद्ध झालेल्या माहितीचा वापर करून या खोट्या प्रचाराचा मागोवा घेतला आहे. त्यातून काही अत्यंत धक्कादायक सत्ये उघडकीस आली आहेत. त्यांनी केलेले विवेचन. जे अशा प्रकारचे पहिलेच आहे, तथाकथित मुस्लीम दहशतवादामागील खऱया शक्तीचा रहस्यभेद करून त्यांचे सत्य स्वरूप उघड करत आहे. जिगरबाज आणि सत्याचा पाठपुरावा करणाऱया महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी आपला पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचा पद्धतशीरपणे खून करून बदला घेणाऱया याच खऱया दहशतवादी शक्ती आहेत.
पुस्तकाची झलक