Offer
रुद्र
Status:
Available
Price:
110/- 99/-
Author/Editor:
विलास सारंग
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
98
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
रुद्र एन्कीच्या राज्यात या कादंबरीनंतर खूप वर्षांनी विलास सारंगांची रुद्र ही नवी कादंबरी मराठीत प्रकाशित होते आहे. आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवत रुद्र संस्कृतीच्या इतिहासाच्या गाभ्यात, मिथ्यकथांच्या घनदाट प्रदेशात शिरली आहे. मिथ्यकथा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करत सारंगांनी एक लोकविलक्षण विश्व रुद्रमधून निर्माण केले आहे. रुद्र मधल्या या लोकविलक्षण विश्वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन द्वंद्वं साकार होते. या द्वंद्वाच्या कक्षेत जन्म, मृत्यू, समाजव्यवस्था, लैंगिकता, नातेसंबंध, हिंसा, प्रेम, द्वेष यांसंबंधीच्या विविध अनुभवांना समाविष्ट करत संस्कृतीमधील त्यांच्या स्थानांचा मूलगामी शोध रुद्रमधून घेतला जातो. सूक्ष्म विश्लेषण आणि तीक्ष्ण अर्थनिर्णयन या सारंगांमधील क्षमता येथे कसाला लागलेल्या आहेत. पौराणिक कथनपध्दतीचा जाणीवपूर्वक केलेला उपयोग, कादंबरीच्या प्रचलित संकेतव्यूहाचा अभिनव रीतीने केलेला वापर आणि उपहास-उपरोधाचा स्पर्श झालेली विनोदबुध्दी या विशेषांमुळे रुद्रला वाचनीयतेचे परिमाणही प्राप्त झाले आहे. पारंपरिक मिथ्यकथांचा आर्ष उघडेपणा आणि आधुनिक कथनांमधील मूलभूत संदिग्धता या दोहोंना एकाच वेळी कवेत घेणारी रुद्र मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी ठरावी. डॉ. हरिश्चंद्र थोरात
पुस्तकाची झलक