Offer
फत्ते तोरणमाळ
ISBN:
9789382364474
Status:
Available
Price:
320/- 256/-
Author/Editor:
दिनानाथ मनोहर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
276
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
फत्ते तोरणमाळ व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणारा आणि राजकारणाचे तीव्र भान असलेला नायक हे दिनानाथ मनोहरांच्या कादंबरीलेखनाचे 'रोबो'पासूनचे वैशिष्ट्य आहे. 'फत्ते तोरणमाळ'मध्येही या वेशिष्ट्याचा प्रत्यय येतो. सातपुड्याच्या परिसरातील आदिवासी क्षेत्रामधील जगण्याचा संदर्भ या कादंबरीला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील बाजार केंद्रस्थानी ठेवणारी संस्कृती न्याय, समता, स्वातंत्र्य यांच्या बरोबरीने पर्यावरणाचाही घास घेऊ पाहते आहे. तिच्या विरोधात उभ्या राहू शकणाऱ्या राजकीय जाणिवांचे चित्रण दिनानाथ मनोहरांनी 'फत्ते तोरणमाळ'मध्ये केले आहे. गंभीर राजकीय जाणिवा आणि थ्रिलरचा रूपबंध या दोन गोष्टींनी जोडण्याचा प्रयत्न 'फत्ते तोरणमाळ'मध्ये दिनानाथ मनोहर यांनी केला आहे. समकालीन राजकारणाचे स्वरूप या प्रयत्नामधून स्पष्ट होते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य वाचकाशी संवादही सहजतेने साधला जातो.
पुस्तकाची झलक