Offer
घडत्या इतिहासाची वाळू’
Status:
Available
Price:
70/- 56/-
Author/Editor:
विलास सारंग
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
61
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
घडत्या इतिहासाची वाळू’ ‘घडत्या इतिहासाची वाळू’ हा विलास सारंगांचा दुसरा कवितासंग्रह आहे. अनोखी कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता हे सारंगांच्या प्रतिभाधर्माचे विशेष याही संग्रहातून तीव्रतेने प्रतीत होतात. या संग्रहातील कविता मुख्यत वास्तवसदृश, कल्पित वा फँटसीवजा घटितांमधून बोलते. शब्दांशी क्रीडा करणारी वृत्ती आणि अनुभवांसाठी वेगवेगळी आविष्काररूपे शोधणारी दृष्टी यांमुळे या कवितेत अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. अनुभवांची विविधता असलेल्या या संग्रहाच्या पहिल्या भागातील कवितांना परदेशांतील सामाजिक-सांस्कृतिक व विशेषत राजकीय अनुभवांचा संदर्भ आहे. दुसऱया भागातील कवितांमधून स्वदेशातील सामाजिक-सांस्कृतिक व व्यक्तिलक्ष्यी अनुभव सामोरे येतात. या दोन्ही भागांतील कविता एकूणच मानवी जगण्यातील ताण, त्यातील विपरीतता, विसंगती, अंतर्विरोध व्यक्त करते. मानवी अस्तित्वाची नगण्यता, निरर्थकता व हास्यास्पदताही त्यातून स्पष्ट होते. सारंगांच्या कवितेमधून व्यक्त होणाऱया अनुभवांना सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असले तरी त्यांना भेडसावणारे प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे आहेत. ते प्रामुख्याने तात्त्विक व अतिभौतिकीय स्वरूपाचे आहेत. हे प्रश्न मानवी इतिहास, स्व-परसंबंध, आयडेंटिटी आणि आपली पाळेमुळे यांविषयीचे आहेत, तसेच ते, मानवी अस्तित्वाला लगटून असलेल्या भूक, लैंगिकता, मृत्यू यांविषयीचे आहेत. त्यामुळे ही कविता वाचकाच्या चिंतनशीलतेला आवाहन करणारी, त्याला अंतर्मुख व अस्वस्थ करणारी आहे.
पुस्तकाची झलक