Offer
ब्लॉगच्या आरशापल्याड
ISBN:
9789382364313
Status:
Available
Price:
200/- 180/-
Author/Editor:
मनस्विनी लता रवींद्र
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
136
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
ब्लॉगच्या आरशापल्याड मराठी कथेने गेल्या काही वर्षांत घेतलेली उसळी उत्साहवर्धक आहे. त्यातही कथावाङ्मय प्रकाराच्या किरटेपणाकडे निर्देश करत त्यावर केलेल्या हल्ल्यामुळे स्वतच्या कोशात जाऊन निमूट झालेल्या महानगरी कथावाङ्मयाने धारण केलेला बहुमुखी अवतार अचंबित करणारा आहे. या महानगरी कथाविश्वात मनस्विनी लता रवींद्रच्या कथेने आश्वासक पाऊल टाकले आहे. त्याच्या खुणा तिच्या या पहिल्याच कथासंग्रहात स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. जागतिकीकरणोत्तर कालखंडात एकविसाव्या शतकाच्या आरंभी साहित्याच्या क्षितिजावर आलेली ही तरुण लेखिका स्वतकडे आणि आपल्या भवतालाकडे धीटपणे बघताना, त्यातलं उत्तम आणि हीण आत्मीयतेने निरखत त्याची अभिव्यक्ती बेधडकपणे करताना दिसते. हा बेधडकपणा तिच्या पिढीचाच स्थायीभाव आहे, हे खरं असलं तरी जगण्याची व्यामिश्रता समजून घेण्याची तयारी नसणं हाही तिच्या पिढीचा स्थायीभाव आहे
पुस्तकाची झलक