Offer
लिहित्या लेखकाचं वाचन
Status:
Available
Price:
160/- 144/-
Author/Editor:
विलास सारंग
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
160
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
लिहित्या लेखकाचं वाचन मराठी समीक्षेच्या प्रचलित प्रवाहांमध्ये सहजासहजी सामावून जाणार नाही अशी समीक्षा डॉ0 विलास सारंग गेली काही वर्षे लिहीत आहेत. तीव्र कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि साहित्यकृतीवर रोखलेली नजर या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे सवयीच्या गोष्टींमधूनही त्यांना काहीतरी नवे जाणवत राहते. डॉ0 सारंगांना अनेक गोष्टींबद्दल कुतूहलही वाटते. साहजिकच एरव्ही समीक्षेच्या क्षेत्रात प्रवेश नाकारलेली अनेक नवी आशयसूत्रे त्यांच्या समीक्षेत प्रवेश करतात आणि तिला ताजेपणा व वैविध्य देतात. ‘सूक्ष्म वाचना’ची पद्धती डॉ0 सारंगांना विशेष प्रिय आहे. तथापि, या पद्धतीला अनेकदा ते विशिष्ट संहितेच्या सीमारेषांपलीकडे घेऊन जातात. अनेकदा समाजवास्तव हीच त्यांची ‘संहिता’ ठरते. सैद्धान्तिक समीक्षा आणि प्रत्यक्ष समीक्षा यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या संकराला भोवतालच्या समाजवास्तवाचे आणि स्वतच्या सर्जनशीलतेचे दुहेरी परिमाण डॉ0 सारंग प्राप्त करून देतात. सखोलता आणि व्यामिश्रता यांच्याशी किंचितशीही तडजोड न करता अनौपचारिक शैलीची सहजता साधल्यामुळे त्यांची समीक्षा संवादसुलभ आणि वाचनीय होते. ‘लिहित्या लेखकाचं वाचन’मधून डॉ0 विलास सारंग यांच्या समीक्षालेखनाची ही सर्व वैशिष्ट्ये पुन्हा एकदा प्रकट झाली आहेत.
पुस्तकाची झलक