Offer
रिबोट
ISBN:
9789382364726
Status:
Available
Price:
300/- 270/-
Author/Editor:
जी. के. ऐनापुरे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
219
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
रिबोट मराठी कादंबरीच्या पसाऱयात ‘रिबोट’ ही कादंबरी आशय आणि भाषेच्या अंगाने नव्या शक्यता निर्माण करताना दिसते. गिरणी संपाने गिरणगावाची झालेली वाताहत चित्रित करताना, ती एका विशिष्ट पात्राच्या अंगाने विस्तारीत न होता, गिरणगाव व बि.डी.डी. चाळीच्या सांस्कृतिक अवकाशाचा विचार करताना दिसते. हे करताना काही काळ ती माहितीपटासारखे वळण घेते. कामगार सेना, लाल बावटा व इतर दुय्यम संघटनांचा ह्या संपाच्या निमित्ताने झालेला अंत, काँग्रेसी राजकारणाची हतबलता आणि यामुळे सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेल्या द्वंद्वाचा ही कादंबरी वेध घेते. एलिट वर्गाच्या विळख्यात गेलेले गिरणगाव, त्यातून हद्दपार झालेली माणसे, अवशेषासारख्या दिसणाऱया बि.डी.डी. चाळी, त्यातील सांस्कृतिक उदासिनता, ह्याचे चिकित्सक चित्रण बहुआयामी पद्धतीने ‘रिबोट’मध्ये पहिल्यांदाच झालेले दिसते.
पुस्तकाची झलक