Offer
निःशब्द झुंज
ISBN:
9788192289885
Status:
Available
Price:
175/- 149/-
Author/Editor:
रेणू गावसकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
160
Language:
मराठी
Edition:
तिसरी

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
निःशब्द झुंज नका, नका आयाबाया नका करू माझी कीव झालं माझं समाधान आता माझा माले जीव. बहिणाबाईंच्या जीवनानुभवातून सिद्ध झालेल्या या शब्दांना प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात उतरविणाऱया अनेक स्त्र्ाया रेणू गावस्करांना त्यांच्या वाटचालीत भेटल्या. सुरुवातीला वंचित मुलांच्या परिघातला एक भाग म्हणून समोर आल्या. पुढे पुढे अनेक सामाजिक प्रश्नांच्या संदर्भानिशी असंख्य स्त्र्ायांशी गाठीभेटी होत राहिल्या. कितीकांशी जिवाभावाचे मैत्र जडले. यातील अनेक स्त्र्ायांना समाजानं ‘सामान्य’ हीच उपाधी दिली होती. पण या ‘सामान्य’ स्त्र्ायांनी संकट दत्त म्हणून समोर उभं राहताच दिलेली झुंज खऱया अर्थानं ‘असामान्य’ होती. ‘अबला’ समजल्या जाणाऱया या प्रबलांनी वेळ येताच, परिस्थितीशी झगडतांना जे अतुलनीय धैर्य दाखवलं, त्यातून या स्त्र्ायांनी लेखिकेच्या मनात स्थान पटकावलं. व्यसनांशी झगडणाऱया स्त्र्ाया असोत, की शरीरविप्रयाच्या व्यवसायात सापडल्यावरही आपली मूल्यं जिवापाड जपणाऱया स्त्र्ाया असोत, या तेजस्विनींच्या दर्शनानं लेखिकेचं मन दिपून गेलं खरं! या स्त्र्ायांचं असामान्यत्व, त्यांचं धैर्य आणि चातुर्य शब्दबद्ध करायला हवं, समाजात अशा स्त्र्ायांचं यथोचित कौतुक व्हायला हवं, असं रेणू गावस्करांमधील लेखकाला वाटलं. हे पुस्तक म्हणजे रोजच्या व्यवहारात सामान्य म्हणून समजल्या गेलेल्या स्त्र्ायांचं अनोखं दर्शन आहे. त्यांनी आपापल्या जीवनात दिलेल्या निःशब्द झुंजीचा हा शब्द आलेख आहे.
पुस्तकाची झलक