Offer
श्रीलिपी
ISBN:
97881922289823
Status:
Available
Price:
220/- 176/-
Author/Editor:
किरण गुरव
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
212
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
श्रीलिपी नवे शतक नवी गती, नवे पेच, नवे आजार घेऊन आले. या शतकातील एक दशक संपूनही गेले. या दशकाच्या गतीला, प्रश्नांना, आजाराला थेट भिडणारी कथा किरण गुरव यांच्या ‘श्रीलिपी’ या कथासंग्रहात वाचावयास मिळते. खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती-प्रवृत्ती, राजकारणाने घेतलेले नवे वळण, गावाचे ढासळतेपण, तरुणांची बदललेली मानसिकता, एकूणच जगण्यातील गुंतागुंत, नात्यात निर्माण झालेले अभाव, जातीच्या अहंकाराचे तीक्ष्ण झालेले कंगोरे गुरव यांच्या कथेच्या केंद्रभागी आहेत. व्यामिश्र आशयसूत्रे, तपशिलाची जाणीवपूर्वक केलेली निवड आणि तपशील वितरणाची अनोखी पद्धती यामुळे किरण गुरव यांच्या कथा भरघोस आणि आशयसंपन्न बनतात. नव्या शतकाने जन्मास घातलेली भाषा सहजगत्या आपलीशी करून हा लेखक शैलीचे नवे रूप घडवितो. निवेदन-भाषा आणि शैली यांच्या एकरूपतेतून ही कथा आटीव आणि रेखीव शिल्पाचे रूप धारण करते. ही कथा आजची ताजी आणि विचारप्रवण करणारी समकालीन कथा आहे म्हणूनच ती महत्त्वाची कथा ठरते.
पुस्तकाची झलक