Offer
करंटा
ISBN:
9789382364146
Status:
Available
Price:
100/- 90/-
Author/Editor:
भाऊ पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
80
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
करंटा स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधपतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या ‘करंटा’ या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परिमाणांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधले राजकारण, या साऱयाला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची माणूसपणावरची नजर किंचितशीही हटत नाही. - हरिश्चंद्र थोरात
पुस्तकाची झलक