Offer
संदर्भासहित स्त्रीवाद
ISBN:
9789382364191
Status:
Available
Price:
1000/- 850/-
Author/Editor:
वंदना भागवत, अनिल सपकाळ, गीताला वि. मं.
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
579
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
संदर्भासहित स्त्रीवाद खाजगीकरणाची आक्रमकता आणि शासनाची कल्याणकारी भूमिकेतून माघार या दोन वास्तवांमध्ये आजचे आपले जीवन खूपच अस्थिर झाले आहे. या अस्थैर्यातून सामायिकतेची जाणीव ढासळत चालली आहे. अशावेळेस एकच चर्चाविश्व समाजव्यवस्थेची मीमांसा करायला पुरेसे ठरत नाही. त्यामुळे विविध चर्चाविश्वांमधील आंतरसंबंध नव्याने तपासता येतील का? विविध वास्तवांमधले दुःखाचे अवकाश समजून घेता येतील का? अतिविशिष्ट होत चाललेल्या ज्ञानशाखांनी समग्रतेचा विचार कसा करायचा? ज्ञानविस्फ़ोटाच्या काळात कोणत्याही ज्ञानशाखेत विशिष्ट प्रामाण्य अपरिहार्य होत चालले आहे. तरीही या विविध प्रागतिक प्रवाहांना एकमेकांशी जोडून घेणे शक्य नाही का? कोणत्याही तत्वज्ञानाची, विचारधारेची किंवा आचारसंहितेची सभ्यता त्यातील स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या प्रगल्भतेवर ठरत असते. यादृष्टीने चिंतन व कृती यांची सांगड घालत, मानवी जीवनाला पायाभूत असणार्या स्त्री-पुरुष नात्याचे विविध संदर्भ तपासत, स्त्रीवादी विचारव्यूह आणि स्त्रियांची आंदोलने यांचा धांडोळा घेत, भविष्यकाळाच्या अनुषंगाने आपल्या समोरील आव्हानांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न स्त्रीवादी चिंतनातून या संपादनात केला आहे.
पुस्तकाची झलक