Offer
डॉ. मयंक अर्णव
ISBN:
9789382364412
Status:
Available
Price:
280/- 238/-
Author/Editor:
आनंद विनायक जातेगावकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
236
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
डॉ. मयंक अर्णव उच्चभ्रू आईवडिलांनी केलेला आपल्याच तरुण मुलीचा खून ही घटना डॉ. मयंक अर्णव या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. वरकरणी सनसनाटी वाटण्राया या घटनेमध्ये खोलवर शिरून तिच्यामध्ये दडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक व्यामिश्रतेचा वेध आनंद विनायक जातेगांवकरांनी या नव्या कादंबरीमध्ये घेतला आहे. लैंगिक संबंध मुळाशी असलेल्या हिंसेच्या आशयसूत्राला जातेगांवकर जाणीवपूर्वकतेने नैतिकतेच्या प्रदेशात घेऊन जातात. या प्रवासामधून लेखकाच्या दृष्टीमधील करुणा, सहानुभाव आणि मानवी संबंधांविषयीची संवेदनशीलता यांचे सतत दर्शन होत राहते. एकाच घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण, घटनांच्या मानसिक संदर्भांना दृग्गोचर करणारी तरल शैली, न्यायालय-पोलीस-माध्यमे-सर्वसामान्य लोक-कथक आणि पात्रे यांच्या अनेकविध आवाजांची पीळदार वीण आणि या सर्वांना व्यपून असलेले जीवनव्यवहाराचे प्रगल्भ भान; या सर्व विशेषांमुळे डॉ. मयंक अर्णव समृद्ध झाली आहे.
पुस्तकाची झलक