Offer
भोवळ
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
हेमंत देसाई
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
140
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
भोवळ जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर भारतातील वास्तव झपाट्याने बदलत गेलं. खुलेपणाचा मंत्र घेऊन आलेले हे बदल या स्थित्यंतराच्या काळात समस्यांचा गुंता वाढवणारे ठरले. शेअर बाजार, सहकारी क्षेत्र, बँका, उद्योगधंदे आणि सरकार यांच्यातले परस्परसंबंध तणावाचे बनले. एक नवा आत्मकेंद्री नवश्रीमंत वर्ग निर्माण झाला... अशा वातावरणात दादरमधील एक सहकारी बँक बुडाल्यानंतर, या घटनेचे प्रतिध्वनी कॉर्पोरेट, शेअर, मिडिया आणि पेज थ्री जगतात उमटले... ही झळ सामान्य माणसाच्या जगण्याला येऊन भिडायलाही वेळ लागला नाही. आशिष पाटील, नेहा अत्रे, नयनिका, नाना हे सारेच या घटनाचक्राचे साक्षीदार... मध्यमवर्गीय नाना अपरिहार्यपणे या वादळात सापडतात तेव्हा काय घडतं याचा लेखाजोखा मांडणारी ‘भोवळ’ ही कादंबरी मराठी वाचकाला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे. आपल्या संवेदनशील वैचारिक लिखाणाबद्दल नामवंत असलेले लेखक-पत्रकार हेमंत देसाई यांची ही पहिलीच कादंबरी आहे. तिच्या रूपाने मराठी कादंबरीच्या जगात एका नवीन विषयक्षेत्राने प्रवेश केला आहे. आर्थिक विश्वाचा तपशील आणि खोली या कादंबरीत साकार करताना लेखकाने कादंबरीच्या कलात्मकतेशी कुठलीही तडजोड केलेली नाही. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडित असलेली ही वेधक आणि भेदक कादंबरी वाचकांना निश्चितच गुंगवून टाकेल.
पुस्तकाची झलक