Offer
कथनात्म साहित्य आणि ‘समीक्षा
Status:
Available
Price:
300/- 240/-
Author/Editor:
हरिचंद्र थोरात
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
302
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
कथनात्म साहित्य आणि ‘समीक्षा ‘कथनात्म साहित्य’ आणि ‘समीक्षा’ हे डॉ0 हरिश्चंद्र थोरात यांच्या विशेष आस्थेचे विषय आहेत. या पुस्तकाच्या दोन विभागांमधून या दोन विषयांवरचे डॉ0 थोरात यांचे अलीकडचे लेखन समाविष्ट करण्यात आलेले आहे. या पुस्तकातील ‘कथनात्म साहित्य’ या विभागात मराठीमधील अनेक महत्त्वाच्या कथा-कादंबऱयांची वैशिष्ट्यपूर्णता डॉ0 थोरातांनी साक्षेपाने आणि चिकित्सापूर्वक टिपली आहे. कथनमीमांसेचा सर्जनशील उपयोग हे येथील लेखनाचे वैशिष्ट्य आहे. कथनमीमांसेचा उपयोग केवळ कथनव्याकरणाच्या निर्मितीसाठी न करता विशिष्ट कलाकृतीच्या अर्थनिर्णयनाच्या दिशेने पुढे जात कथनमीमांसेचा सांधा ऐतिहासिकतेशी जोडण्याचा एक अत्यंत वेधक प्रयत्न डॉ0 थोरात यांच्या लेखनात आढळतो. ‘समीक्षा’ या दुसऱया विभागमधून डॉ0 थोरात यांचे समकालीन मराठी समीक्षेचे आकलन सादर झाले आहे. मराठीतील महत्त्वाच्या समीक्षकांच्या लेखनाचा परखड आणि विश्लेषक परामर्श डॉ0 थोरात यांच्याकडून घेतला गेला आहे. समकालीन मराठी समीक्षेवरचा हा क्ष-किरण आहे, असे म्हणता येईल. संकल्पनात्मक पातळीवरची चोख मांडणी, समतोल वृत्तीने केलेले वस्तुनिष्ठ मूल्यमापन, विषयाच्या तळात उतरण्याची क्षमता, निर्भय सडेतोडपणा आणि इतिहासाचे भान या पैलूंमुळे हा क्ष-किरण विशेष तीव्र आणि म्हणून सत्यदर्शी झाला आहे. öमिलिंद मालशे.
पुस्तकाची झलक