Offer
सर्व प्रश्न अनिवार्य
ISBN:
9788192289847
Status:
Available
Price:
300/- 240/-
Author/Editor:
रमेश इंगळे उत्रादकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
259
Language:
मराठी
Edition:
तिसरी

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
सर्व प्रश्न अनिवार्य मूल्यमापन ही शिक्षणप्रक्रियेतील एक महत्त्वाची प्रक्रिया असून शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांत घडून येणारे इष्ट परिवर्तन पडताळण्यासाठी लेखीपरीक्षा हे मूल्यमापनाचे साधन अवलंबले जाते. लेखीपरीक्षेतल्या गुणांवरून विद्य्यार्थ्यांची गुणवत्ता व बौद्धिक उंची आंधळेपणाने मोजली जाते. दहावी-बारावीच्या परीक्षेत मिळणाऱया गुणांना आयुष्याचे पुढचे मार्ग निवडण्यासाठी अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण आणि ज्ञान यापेक्षा परीक्षेतले गुण कळीचे ठरतात. मग ते मिळविण्यासाठी कॉपीसारख्या गैरप्रकारांचा सुळसुळाट होतो. ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ ही शिक्षणव्यवस्थेतील परीक्षापद्धतीत शिरलेल्या गैरमार्गांची कथा आहे. तसेच ती या व्यवस्थेत होरपळणाऱया प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ शिक्षकांची घुसमट मांडते. शैक्षणिक पर्यावरण ही जरी या कादंबरीची मुख्य आशयवस्तू असली तरी तिच्या निमित्ताने आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटताना लेखकाने समकालीन वास्तवातील मूल्यऱहासाचे, नैतिक अधःपतनाचे भेदक दर्शन घडविले आहे.
पुस्तकाची झलक