Offer
विवेकी पालकत्व
ISBN:
9788192289854
Status:
Available
Price:
240/- 216/-
Author/Editor:
डॉ. अंजली जोशी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
204
Language:
मराठी
Edition:
चौथी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विवेकी पालकत्व पालकांना मार्गदर्शन करणाऱया सर्व प्रकारच्या साहित्यांत भर घालण्यास एक विशेष कारण आहे. ते असे की, हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे आजपर्यंतचे एकमेव पुस्तक आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. डॉ.अल्बर्ट एलिस यांनी जन्म देऊन विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून लेखिकेने पीएच.डी. ही पदवी संपादन केलेली आहे. परंतु या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा आविष्कार नव्हे; तर लेखिकेने स्वतःच्या मुलाचे संगोपनही सतत जागरूक राहून विवेकी पद्धतीने केले आहे. परिणामी त्याचे व्यक्तिमत्त्वही अनेक अंगांनी बहरून आले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी लेखिकेच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक धडे आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. - कि.मो.फडके (प्रस्तावनेतून)
पुस्तकाची झलक