Offer
अमर्याद आहे बुद्ध
Status:
Out Of Stock
Price:
0/-
Author/Editor:
विलास सारंग
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
178
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
अमर्याद आहे बुद्ध मानवी आयुष्याला असलेली अस्तित्वलक्ष्यी परिमाणे शोधू पाहण्याच्या दृष्टीतून बुद्ध अपरंपार महत्त्वाचा आहे. या बाबतीत बुद्धाला देशकालपरिस्थितीच्या मर्यादा नाहीत. तो अमर्याद आहे. तो जितका भूतकाळाचा, तितकाच वर्तमानाचा आणि भविष्याचा आहे. बुद्धाच्या जाणिवेची ही अमर्यादता विलास सारंग यांच्या ‘अमर्याद आहे बुद्ध’ या नव्या कादंबरीचे आशयसूत्र आहे. बुद्धाची जाणीव आणि तिचे वर्तमानातून केलेले, वर्तमानाचा संदर्भ असलेले अर्थनिर्णयन केंद्रस्थानी असलेली ही कादंबरी अत्यंत अपारंपरिक पद्धतीने लिहिली गेली आहे. ती कुठल्याच काळात स्थिर होत नाही. काळाची भूमी ती सातत्याने बदलत राहते. काळाच्या पातळीच्या कुठल्याही मर्यादांमध्ये ती बंदिस्त होत नाही. तिला कोठला तरी एक निवेदक नाही. बदलत्या निवेदकामुळे बदलत जाणारी मूल्यदृष्टी कादंबरीला अधिक व्यामिश्र करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आशयसूत्रांनाही कालाच्या प्रवाहीपणाचे संदर्भ आहेत. ही परस्परपूरकता कादंबरीने उभारलेल्या जगाला एकात्मता देते. ‘अमर्याद आहे बुद्ध’ केवळ बुद्धाच्या चरित्राचे कथन करण्यासाठी निर्माण झालेली कादंबरी नाही. ती बुद्धाच्या विश्वभानाचा वेध घेऊ पाहते. यामुळेच ती लक्षणीय ठरते.
पुस्तकाची झलक