Offer
उभं आडवं
ISBN:
9789382364535
Status:
Available
Price:
350/- 280/-
Author/Editor:
राहुल कोसंबी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
312
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
उभं आडवं 'उभं आडवं'मधून राहुल कोसंबी यांचे विवेचनपर गद्य प्रथमच पुस्तकरूपाने मराठी वाचकांसमोर येते आहे. या ताज्या दमाच्या लेखनातून सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भानाची ऊर्जा ओसंडून वाहते आहे. भोवती घडणाऱ्या घटितांचे खोलवरचे विश्लेषण हा या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. राहुल कोसंबी शोषितांच्या प्रत्यक्षातील जगण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि या मूर्त परिस्थितीच्या संपर्कात आपला सैद्धान्तिक व्यूह आणतात. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धान्तव्यूह यांची अशा प्रकारे सांगड घातल्यामुळे राहुल कोसंबी यांचे विवेचन असांकेतिक रीतीने जिवंत, व्यामिश्र आणि सामाजिक जीवनाच्या विविध स्तरांवर प्रकाशझोत टाकणारे झाले आहे.
पुस्तकाची झलक