Offer
तंदूरच्या ठिणग्या
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
विलास सारंग
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
120
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
तंदूरच्या ठिणग्या तंदूरच्या ठिणग्या’ ही विलास सारंगांची नवी कादंबरी आधुनिक माणसांचे समाजातील परस्परसंबंध आणि त्यांना वेढून असणाऱया गुन्हा, शिक्षा, न्याय अशा विविध संकल्पनांवर प्रकाशझोत टाकू पाहते. या संकल्पनांच्या समाजमान्यतेच्या आधारावर व्यक्ती आपले आयुष्य जास्तीत जास्त सुरक्षित करू पाहत असतात. मात्र हा आधार जर नाहीसा झाला तर संबंधांना अर्थपूर्ण करणारे आपल्याजवळ काय राहते हा त्रस्त करणारा प्रश्न कोठल्याही माणसापुढे उभा राहू शकतो. हा प्रश्न मूल्यव्यवस्थेला हादरवणारा असू शकतो. विलास सारंग समाजमान्य संकल्पनांचा हा आधार काढून घेतात आणि ‘तंदूरच्या ठिणग्या’मधील चंद्रशेखर नायकसमोर त्याच्या जगण्याविषयीच्या कल्पनांना प्रश्नांकित करणारे अनुभव उभे राहू लागतात. या कादंबरीची रचना सहज केल्यासारखी आहे. वरकरणी तिच्यातून काही गंभीर सांगायचे असावे असे वाटत नाही. एखाद्या रहस्यकथेत शोभाव्यात अशा खळबळजनक घटनांनी तिचे कथानक आकाराला आले आहे. तिच्यातील पाताळलोकाची उभारणी वाचकांना अद्भुतिकेची आठवण आणून देईल अशीच आहे. मात्र या घटनात्मकतेच्या तळाशी मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेचा वेध घेऊ पाहणारी विलास सारंगांची वाचकाला अंतर्मुख करील अशी मूल्यदृष्टी आहे. वाचक फार काळ तिच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. तिने लक्ष वेधून घेतले की कथानकातील घटनांचे अर्थ बदलू लागतात, विस्तारू लागतात आणि ‘तंदूरच्या ठिणग्यां’ची दाहकता वाचकाला जाणवू लागते.
पुस्तकाची झलक