Offer
विवादे विषादे प्रमादे प्रवासे
Status:
Available
Price:
135/- 102/-
Author/Editor:
प्रशान्त बागड
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
128
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विवादे विषादे प्रमादे प्रवासे प्रशान्त बागड यांच्या कथांची शीर्षकं लक्ष वेधून घेतातः ‘एक स्पष्ट गोष्ट’, ‘दौत, शाई, टाक’ - आणि यावरही कडी म्हणजे - ‘भाषिक आणि साहित्यिक विश्लेषण’, ‘छंदोभंग’, ‘मायथळ/फेलो’. आपल्याला जाणवतं की कथेमधून काहीतरी निराळं करण्याची बागडांची आकांक्षा आहे. सर्वसाधारणपणे कथेला कृतक् कथेचा आविर्भाव असतो. बागड हे करायचं नाकारतात. कथेचं कथापण खरवडून-खरवडून त्याच्या आत काय आहे हे पाहण्याची बागडांची ईर्ष्या आहे. त्यांच्या कथा बुद्धिवादी व चिंतनपर आहेत. त्यामुळे त्यांची धाटणी काव्यात्म होते. कथेला नवेपणा देणारे हे घटक आहेत. मराठी कथेला अशा प्रकारे पुनरुज्जीवन देण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, ‘तलावातील चांदणे’ असेल किंवा ‘केसाळ काळंभोर पिल्लू’ असेल. यामुळे बागड हे लक्षणीय कथाकार ठरतात. मराठी कथा बदलून टाकण्याचं सामर्थ्य बागड यांच्या कथेत आहे. - विलास सारंग
पुस्तकाची झलक