Offer
हाडकी हाडवळा
ISBN:
9789382364054
Status:
Out Of Stock
Price:
125/-
Author/Editor:
नामदेव ढसाळ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
92
Language:
मराठी
Edition:
पाचवी
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
हाडकी हाडवळा आंबेडकरी संस्कारानंतर दलित आविष्कराने काव्य व कथा या प्रकारांमध्ये जोरकस व आक्रमक असा प्रवेश करून सारे साहित्यविश्व दणाणून सोडले. कादंबरी क्षेत्रात मात्र दलितांची अशी प्रातिभ भरारी जाणवली नाही. 1980-81 मध्ये ही कादंबरी हाती आली तेव्हा वाटले की एक नवी वाट निर्माण होते आहे. ‘आणखी लिही, कादंबऱया लिही,’ असे नामदेवला सांगण्याइतपत मैत्रीपूर्ण परिचय होता. तसे वारंवार सांगितलेही पण नामदेवने नंतर कादंबरी लिहिलीच नाही. ऐंशीपूर्वी ज्या निर्मितिक्षम अशा वैकल्पिक समाधी अवस्थेत जाऊन ही कादंबरी लिहिली, तशी समाधी पुन्हा लावणे राजकारणाच्या धबडग्यात त्याला जमले नसावे. नंतर कोणीच तशी कादंबरी लिहिली नाही. कदाचित समाधीच्या भानगडीत न पडता राग, लोभ, संशय, कडवटपणा इत्यादी पिशाच्चांना खांद्यावर बाळगत त्याने कादंबरी लिहिली असती तर ती अशी निष्पाप करुण-सुंदर झाली नसती. कदाचित ती अधिक बहुमितीयुक्त झाली असती आणि तेही आवश्यक होते. दलित साहित्याचे नव्हे तर मराठी साहित्याचे कादंबरीचे दालन एका प्रतिभेस मुकले, त्याची हळहळ राहिली. पण जी एक ‘हाडकी हाडवळा’ हाती आली तिचे पुरेसे यथायोग्य मूल्यमापन चांगल्या समीक्षकांकडून होणे. राहून गेले याचीही खंत. - अरुण साधू (प्रस्तावनेतून)
पुस्तकाची झलक