Offer
कादंबरी: एक साहित्यप्रकार
Status:
Available
Price:
450/- 360/-
Author/Editor:
हरिचंद्र थोरात
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
416
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
कादंबरी: एक साहित्यप्रकार कोणत्याही सांस्कृतिक उत्पादनांप्रमाणे साहित्यप्रकारही विशिष्ट विश्वभानातून अस्तित्वात येतात. हे विश्वभान अर्थातच सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीच्या संदर्भात निर्माण झालेले असते. साहित्यप्रकारांची अवस्थांतरे होतात, संस्कृतींच्या सीमारेषा ओलांडून ते प्रवासही करू शकतात आणि त्यांचा अंतही होऊ शकतो. यामुळेच साहित्यप्रकारांचा सिद्धान्तव्यूह मांडण्याचा उपक्रम विविध ज्ञानशाखांशी संबंधित असतो. या वस्तुस्थितीचे सखोल भान ठेवूनच कादंबरी : एक साहित्यप्रकार या ग्रंथाने कादंबरी या साहित्यप्रकाराचा सिद्धान्तव्यूह मांडण्याचे आव्हान स्वीकारले आहे. कादंबरीच्या आशयसंबद्ध स्वरूपविशेषांचे आकलन आणि कादंबरीच्या रूपसंबद्ध विशेषांचे विश्लेषण या दोन्ही दिशांनी हा ग्रंथ प्रवास करतो. या दोन्ही दिशा एकमेकींना परस्परपूरक होत अखेरीस एकत्र येतात. आधुनिक युग आणि लोकशाही व्यवस्था यांच्याबरोबर जन्माला आलेल्या व प्रबोधनाच्या परंपरेशी नाते सांगणाऱया कादंबरी या खुल्या साहित्यप्रकाराच्या साहित्यशास्त्राची मांडणी करू पाहणारा हा ग्रंथ आहे. तो मराठीतील कादंबरीविषयक विचाराला, चर्चेला नवे परिमाण प्राप्त करून देईल अशी खात्री वाटते. डॉ. हरिश्चंद्र थोरात हे आधुनिक साहित्यसिद्धान्तांचे आणि कादंबरीचे एक अव्वलदर्जाचे अभ्यासक म्हणून मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. या दोन्ही विषयांवरील त्यांच्या चिंतनाचा मराठी वाचकाला परिचय आहे. त्यांचे हे चिंतन साहित्यशास्त्राबद्दल मर्मदृष्टी देणारे जसे आहे, तसेच विस्तृत असा सामाजिक-सांस्कृतिक अवकाश कवेत घेणारे आहे. या ग्रंथामधूनही त्यांच्या चिकित्सक, मौलिक व समृद्ध दृष्टीचा प्रत्यय येतो. - वसंत पाटणकर
पुस्तकाची झलक