Offer
एका लोकलढ्याची यशोगाथा
ISBN:
9789382364740
Status:
Available
Price:
200/- 180/-
Author/Editor:
संपत देसाई
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
168
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
एका लोकलढ्याची यशोगाथा धरण व प्रकल्पग्रस्तांच्या उद्ध्वस्त कथा आपण आजवर ऐकत आलो आहोत.एखादा नवा प्रकल्प मंजूर झाला की त्या प्रकल्पाने विस्थापित होणारा माणूस प्रकल्पाविरोधात संघर्षासाठी उभा राहतो. जिवाचं रान करून तो लढायला उभा राहतो. कारण त्याच्यासाठी माती ही केवळ माती नसते ती त्याच्यासाठी दुसरी आई असते.सुरुवातीला जिवाची बाजी करून लढणारा माणूस इथल्या व्यवस्थेच्या चक्रात अडकतो. लढ्यात फुटीचे बीज पेरले जाते. काहींना हाताशी धरून लढा कमकुवत केला जातो. टोकदार संघर्ष करणारा माणूस हतबल आणि अगतिक बनतो. पण महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘चित्री’ या मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी केलेला संघर्ष मात्र याला अपवाद ठरला. पुनर्वसन म्हणजे आकाशातला चंद्र आहे. तो जमिनीवर येऊच शकणार नाही या समजुतीला त्यांनी धक्का दिला. ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हा शासननिर्णय अस्तित्वात येण्यापूर्वी हे तत्त्व त्यांनी संघर्षातून प्रत्यक्षात आणले. जे कुठंच घडलं नाही ते घडलं; नव्हे घडविलं. पण जे काही घडलं, घडविलं ते सहज नव्हतं. त्यासाठी एक प्रामाणिक संघर्ष नेटाने उभा राहिला. संघर्षातून सृजनापर्यंतचा त्यांचा हा प्रवास. या प्रवासातील मी एक साक्षीदार नव्हे; तर या लढ्यातील एक बिनीचा शिलेदार. लढा उभा करण्यात पुढाकार घेतलेला, त्यांच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला एक कार्यकर्ता. ते लढत होते, घडत होते अन् मला घडवत होते. त्यांच्या लढण्याचा, माझा लढत लढत घडण्याचा हा जिवंत इतिहास. कार्यकर्ता म्हणून जे अनुभवलं त्याच्याशी प्रामाणिक राहून या लढ्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न.
पुस्तकाची झलक