Offer
राजन गवस यांचे कथातम्क साहित्य
ISBN:
9789382364702
Status:
Available
Price:
300/- 270/-
Author/Editor:
गोविंद काजरेकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
240
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
राजन गवस यांचे कथातम्क साहित्य ऐंशीच्या दशकात लिहिते झालेल्या समकालीन लेखकांमध्ये राजन गवस हे एक महत्त्वाचे नाव आहे. साधारणत: याच कालखंडात परंपराप्रिय रुढीग्रस्त मानसिकता आणि जातिपातीची उतरंड यांच्या बरोबरीने खेड्यापाड्यात हातपाय पसरू लागलेल्या सहकार, शिक्षण आणि विविध चळवळी यांतून शिरलेल्या राजकारणामुळे निर्माण झालेली सत्तेची आणि शोषणाची नवी केंद्रे, यांमुळे खेड्यापाड्यांतील मूल्यव्यवस्था झपाट्याने बदलू लागलेली दिसते. परंपरा आणि धर्मव्यवस्थेमुळे उपेक्षित आणि शोषित ठरलेल्या स्त्रिया, दलित आणि कष्टकरी वर्गाला आपला आत्मसन्मान व अस्तित्त्व टिकवण्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षाला आधुनिक सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थांनी अधिक खडतर बनवले आहे, याचे नेमके भान गवस यांच्या लेखनामधून प्रकट होते. गवस यांच्या साहित्याला या कालखंडातील सामाजिक अभिसरणाचे हे ठळक संदर्भसूत्र आहे. गवस यांच्या साहित्यातून व्यक्त होणारी विविध आशयसूत्रे, त्यासाठी त्यांनी वापरलेली भाषाशैली आणि रचनातंत्रे, तसेच वास्तवता आणि लेखकाची नैतिकता यांसारखी वाङ्मयीन मूल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून नव्या पिढीचे अभ्यासक गोविंद काजरेकर यांनी राजन गवस यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गवस यांच्या कथात्म साहित्याचाच नव्हे, तर समकालीन मराठी साहित्याचा अभ्यास करणार्यां साठी अतिशय उपयुक्त ठरावे असेच हे लेखन आहे, असे निश्चितच म्हणता येते.
पुस्तकाची झलक