Offer
एक होता उंदीर
Status:
Out Of Stock
Price:
0/-
Author/Editor:
मालिका अमरशेख
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
0
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
एक होता उंदीर एक क्षुल्लक चिमूटभर - थेंबभर अस्तित्व... अवकाशाच्या नकाशावर तर नगण्यच. तरी प्रत्येकाची सावली ही प्रचंड - दुःखाची - प्रेमाची - त्यागाची - क्रौर्याचीही. सावली नाहीशी होते - मूळ रूपही - सत्यही सापेक्ष न् चिरंजीव नसूनपण कायम जखमीच. न् सारं काही अशाश्वत असतानाही जगण्याची ही अमोघ चिकाटी - ज्ञान असो की अज्ञान दोन्ही शेवटी दुःखच. निष्कर्ष - शब्द उच्चारल्यावर आपला नस्तोय् तो अर्थांसकट लोकांचा - वातावरणाचा होतो - आपलं काय मग? एक प्रचंड शून्य. काहींच्या शून्याआधी शून्यच तर काहींचे आकडे - म्हणून काही मानवीयतेची - माणूसपणाची किंमत खूप महान आहे, असा भ्रम वा अपेक्षा करू नये. या शून्याच्या कथा असा नकारात्मकतेचा सूरही नाहीय्. काय आहे आणि काय असावं यातला फरक समजतो तो माणूस. अंधार असताना ‘खूप खूप उज्जेडाय्’ असं मी मुळीच म्हणणार नाहीय कदापि.
पुस्तकाची झलक