Offer
टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
ISBN:
9789382364344
Status:
Available
Price:
140/- 126/-
Author/Editor:
जयंत पवार
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
76
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन कथेतला पैस आणि अनुभव शब्दांतून उभा करावा लागतो तर नाटकात शब्दांपलीकडे जाण्याची शर्थ सतत करावी लागते. कथेतलं निवेदन, शब्दांच्या आत दडलेले आणि शब्दांना बाहेरून लगडलेले अर्थ वाचकाच्या मनोमंचावर एक अद्भुत दुनिया उभी करतात तर नाटकाच्या मंचावर अंधारातून येणाऱया प्रकाशाच्या तिरिपेत बागडणाऱया नटांच्या शरीरातून, आवाजातून एक जादुई दुनिया आकार घेत असते. दोन्हींची आयुधं वेगवेगळी आहेत, हे लक्षात घेतल्यावर कथेचं नाटकात रूपांतर करताना तिच्यातले शब्द जसेच्या तसे स्वीकारता येणार नाहीत, तिने सांगितलेला अनुभव मुळाबरहुकूम सांगता येणार नाही हे उघडच आहे. त्यामुळे केवळ शब्दांतून निर्माण होणाऱया दुनियेला दुसऱया भूमीवर साकारताना समांतर प्रतिमा, भाषितांच्या आणि निर्भाषितांच्या जागा शोधाव्या लागतात. कथेने जे म्हटलंय तेच नाटकाने म्हणावं हा आग्रह रास्त असला तरी तो ताणण्यात अर्थ नसतो. नाटककाराला अर्थनिर्णयनाचा हक्क देणं आणि त्याने कथेत लपलेल्या जागांना रंगमंचाच्या अवकाशात रंगभाषेच्या सहाय्याने प्रकट होण्यासाठी वाव देणं व त्यासाठी पुरेसं स्वातंत्र्य घेणं गरजेचं असतं. माझ्या लेखी कथेचं नाट्यरूपांतर करणं ही कथालेखनाइतकीच स्वतंत्र गोष्ट असते. -जयंत पवार
पुस्तकाची झलक