Offer
लागलेली नाटकं
ISBN:
9789382364689
Status:
Available
Price:
350/- 315/-
Author/Editor:
राजीव नाईक
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
296
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
लागलेली नाटकं राजीव नाईक ह्यांनी नाटकं वाचली, पाहिली, शिकवली, लिहिली आणि केली. त्यांनी पाहिलेल्या-वाचलेल्या नाटकांशी शारीरिक-मानसिक-बौद्धिक पातळीवर मनस्वीपणे नातं जोडू पाहाण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांना अनेक नाटकं लागली. ‘घाशीराम कोतवाल’ लागलं तसं ‘ऑथेलो’ही; ‘बेगम बर्वे’ लागलं तसं ‘शारदा’ही. ही नाटकं का व कशी लागली ह्याचा संहितेच्या आधारानं काटेकोरपणे शोध घेताघेता त्यांचा अर्थ त्यांच्या अधिकाधिक हाती येत गेला. त्यांचा प्रत्येक नाटकाकडं पाहाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नाटकाचा कधी समग्र विचार केला आहे, तर कधी एकाच अंगावर लक्ष केंद्रित केलं आहे. प्रत्येक लेखात आपल्याला लेखकाच्या व्यासंगाबरोबर, त्याचं व्यक्तिमत्त्व जाणवत राहतं. हे व्यक्तिमत्त्व आणि ते ज्या ताजेपणानं व्यक्त होतं, त्यातून ह्या लेखनाविषयी एक प्रकारचं ममत्व निर्माण होतं. नाटय़कलेतील आप्ताचा संवेदनशील आपलेपणा, तीक्ष्ण बुद्धीच्या समीक्षकाचा निकोप दृष्टिकोन, मिष्कील मार्मिकता, संदर्भक्षेत्राचा व्यापक विस्तार, भाषेची सर्जनशील लवचीकता, वातड पंडिती परिभाषेची गैरहजेरी, ह्या सर्वांमुळं आपण उद्दीपित मनःस्थितीत ‘लागलेली नाटकं’ हा नाटय़लेखसंग्रह वाचत जातो आणि वाचतच राहतो. - शांता गोखले
पुस्तकाची झलक