Offer
थालीपीठ
ISBN:
9789382364337
Status:
Available
Price:
150/- 135/-
Author/Editor:
भाऊ पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
131
Language:
मराठी
Edition:
तिसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
थालीपीठ मराठी कथात्म साहित्यात लघुकथेचा हलकल्लोळ चालू असताना मराठी समूहाच्या अस्सल कथनपरंपरेचे सजग भान जागते ठेवून ज्या मोजक्या लेखकांनी कथा लिहिल्या त्यामध्ये भाऊ पाध्ये यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. खुली आशयसूत्रे आणि मोकळे शेवट हे त्यांच्या कथेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य. पात्रांचे साचेबंद ठोकळे निर्माण न करता भोवतालच्या माणसांना कथेच्या कल्पितव्यूहात प्रवेश देऊन मुक्त वावराचा पैस पाध्ये यांची कथा उपलब्ध करून देते. त्यामुळेच आबा टुकरूळ, माई टुकरूळ, ‘चलो ना’वाली, अनसूयाबाई यांसारख्या अविस्मरणीय व्यक्तिरेखा पाध्ये यांच्या या कथासंग्रहात भेटतात. स्त्राr-पुरुष संबंधाचा निर्मळ, निर्मम शोध पाध्ये यांची कथा घेते. त्यांच्या थालीपीठ या संग्रहातील फाइव्ह गार्डन, कुटुंब, ‘चलो ना’ वाली या मराठीतील सर्वश्रेष्ठ कथांच्या पंगतीत बसणाऱया कथा आहेत. ‘चलो ना’ वाली ही तर मराठीतील अविस्मरणीय कथा आहे. सरळ, साधी, थेट व्यवहारभाषा त्यांच्या कथांचे वैभव वाढवते. पाध्ये यांच्या या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणाऱया कथा आहेत. मराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक ठरणारा आहे. - राजन गवस
पुस्तकाची झलक