Offer
रिंगाण
ISBN:
9789382364658
Status:
Available
Price:
220/- 198/-
Author/Editor:
कृष्णात खोत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
164
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
रिंगाण ‘रिंगाण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं आलेलं चित्रण हा कादंबरीचा दृश्यस्तर; तर उत्क्रांतीच्या नव्या दिशेचं दर्शन हा गर्भित स्तर आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवाप्पाचा संघर्ष उभा राहातो. हा संघर्ष देवाप्पाचा नि फक्त त्यांचा न राहाता मानवजातीचा नि निसर्गाचा होतो. हे कोडं उत्क्रांतीचं आहे. प्राणी उत्क्रांत होत असताना परिस्थितीनुसार शरीरात आवश्यक ते बदल करत उत्क्रांत होत गेला. पण त्याच प्राण्यामध्ये आपल्या मूळ पिंडावर जाण्याची क्षमताही असते हे देवाप्पाबरोबर संघर्ष करणार्या म्हशींच्या वागण्यावरून लक्षात येते. निसर्गानं करून ठेवलेली ही सोय मानवप्राणीही कधीतरी उपयोगात आणील हे या कादंबरीतून सूचित होते. सजीवांच्या उत्क्रांतीची ही नवी दिशा एखाद्या ललितकृतीतून मांडली जाणं ही मराठी साहित्यविश्वातील पहिलीच घटना आहे. डॉ. आनंद जोशी
पुस्तकाची झलक