Offer
तल्खली
ISBN:
9789382364788
Status:
Out Of Stock
Price:
0/-
Author/Editor:
माया पंडित
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
0
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
तल्खली ‘तल्खली’ या नावातच सर्वांग होरपळून काढणारा दाह आहे. हा दाह सोसणाऱ्या आयुष्यातल्या दुःखाच्या असंख्य मिती या कवितेतून गडद-गहिऱ्या रंगासह प्रकटतात. हे दुःख कधी श्वापदासारखे येते तर कधी अनाथ लेकरासारखे. वहिवाट म्हणून चालत आलेले दुःख साऱ्या वाटाच जिथे बंद होतात अशा वेदनेच्या तळघराशी या कवितेला जोडून घेते. माया पंडित यांच्या कविता बाईच्या पदरी बांधलेल्या दुःखाच्या असल्या तरी त्या रूढिबाज ‘माहेरवाशिणींचे’ हुंदके, उसासे आणि हर्ष-खेदाची कहाणी सांगणाऱ्या नाहीत. एकलेपणा, टाकलेपणा वाट्याला आलेल्या ‘बाहेरवाशिणींच्या’ जगाचा तळकोपरा त्या उघड आणि उजळ करतात. विलक्षण सच्चा-समंजस सूर या कवितांना लाभल्याने ‘मज टाकिले परदेशी’ म्हणणाऱ्या जनीच्या कुळाशी या कवितेचे नाते आहे. वंचना, विषाद वाट्याला आल्यानंतरही या कवितेतले दुःख पृष्ठस्तरावरील कैफियत एवढ्यापुरतेच मर्यादित राहात नाही. आवेग ओसरल्यानंतरचे श्रांतपण या कवितेला अर्थवत्ता बहाल करते. लय सांभाळण्यासाठी केली जाणारी कृतप् शब्दयोजना आणि किमान कौशल्याच्या आधारे साधली जाणारी कारागिरी यापासून ही कविता पूर्णपणे मुक्त तर आहेच पण या कवितेची अनघड क्वचितच ओबडधोबड वाटणारी रचना तिचे सच्चेपण ठसठशीतपणे नोंदवते.
पुस्तकाची झलक