Offer
महात्मयाची दुसरी हत्या...
ISBN:
9789382364641
Status:
Available
Price:
190/- 171/-
Author/Editor:
राम पुनियानी, विवेक कोरडे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
156
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
महात्मयाची दुसरी हत्या... विविधतेने नटलेला, लोकशाही देश हे स्वरूप घेऊन भारताने स्वातंत्र्य मिळविले. महात्माजींच्या नेतृत्वाखाली चाललेले स्वतंत्रता आंदोलन हे एक जनतेचे व्यापक आंदोलन होते. त्या आंदोलनात सर्व धर्मांच्या, जातींच्या स्त्री-पुरुषांनी भाग घेतला होता. ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी झालेल्या या चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयींचा आधार होता. त्याचबरोबर जातिनिर्मूलन आणि स्त्री-पुरुष समानता या संबंधीच्या चळवळीही स्वातंत्र्य चळवळीच्या बरोबरीनेच वाढल्या. गांधीजी हे स्वतः हिंदू होते. मात्र धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे, असे त्यांचे ठाम मत होते. या ठाम मतासाठीच हिंदुतत्वाचे तत्त्वज्ञान मानणार्या लोकांनी त्यांचा खून केला. हिंदुत्व व हिंदू धर्म एक नव्हे. हिंदुत्व हा एक असहिष्णु राजकीय प्रवाह आहे, पण ब्राह्मणी हिंदू धर्म हा त्याचा पाया आहे. हिंदुत्व मानणारे लोक स्वातंत्र्य चळवळीशी कायम फटकून राहिले. पण आज मात्र ही मंडळी देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच आहे, असे भासवत आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या भाष्यातून हिंदू धर्म सहिष्णू धर्म आहे, असेच लोकांमध्ये मुरविले जाते. ही शिकवण गांधीजींना अभिप्रेत असलेल्या भक्ती व संत परंपरेला पूर्णपणे छेद देणारी आहे. आपल्या देशात धर्मनिरपेक्षेतेवर हिंदुत्ववादी शक्ती विविध प्रकारे हल्ला करीत आहेत. आपल्या देशातील लोकशाही भक्कम करण्यासाठी या देशातील विविध विभागांना एकत्र आणण्यात गांधीजींचे मोठे योगदान आहे. त्यांच्या शिकवणुकीचे विविध पैलू ठळकपणे सर्वांपुढे मांडणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.
पुस्तकाची झलक