Offer
विचारसंचित
ISBN:
9789382364368
Status:
Out Of Stock
Price:
380/-
Author/Editor:
दुर्गा भागवत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
348
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विचारसंचित ‘बांधिलकी म्हणजे श्रद्धा नव्हे, किंवा माझा तुमच्यावर विश्वास असेल, पण म्हणून मी तुम्हाला बांधलेली आहे, असं नव्हे, कदाचित मी तुम्हाला बांधलेली असेन; पण माझा तुमच्यावर विश्वास नाही, असंही घडू शकतं. तीच गोष्ट निष्ठेची. जिथे निष्ठा आहे, तिथे बांधिलकी असेलच असं नाही. उलट जिथे बांधिलकी आहे तिथे निष्ठा असेल असंही नाही. बांधिलकी म्हणजे धार्मिक अर्थाच्या श्रद्धा नव्हेत. तेव्हा श्रद्धा, निष्ठा, विश्वास आणि बांधिलकी ही सगळी एक नव्हेत. बांधिलकी हा शब्द आम्ही फार सैल अर्थानं वापरतो... माणसानं बांधिलकी अजिबात त्याज्य मानावी असं मला सुचवायचं नाही तर बांधिलकीचे चुकीचे, त्याज्य आणि अंतिम परिणामांच्या दृष्टीनं मनुष्यजातीला हानिकारक ठरणारे पर्याय बाद ठरवावेत. उलट बांधिलकीच्या विचारात जे चांगलं आणि उदात्त असं काही आहे ते स्वीकारलं जावं म्हणून माझे प्रयत्न आहेत. बांधिलकीमध्ये ठाम भूमिका घेणं असाही एक अर्थ आहे. टू कमिट वनसेल्फ म्हणजे विचारांती ठाम भूमिका घेणं आणि त्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं. प्रामाणिकपणाबरोबरची बांधिलकी मला स्वीकारार्ह वाटेल.’ ‘बांधिलकी आणि आम्ही’ या दुर्गाबाईंच्या लेखातून
पुस्तकाची झलक