Offer
आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते
ISBN:
9789382364801
Status:
Out Of Stock
Price:
0/-
Author/Editor:
सुदाम राठोड
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
0
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते कवीचा शब्द कुणाला उद्देशून उच्चारलेला नसतो तेव्हा त्याचे स्वरूप आत्मसंवादाचे असते. स्वतःला किंवा इतरांना अनुस्यूत ठेवून बोलणे हा कवितेचा स्वभावधर्म आहे. कवी सुदाम राठोड यांच्या कवितेत संवादाच्या या दोन्ही तऱहा ठळकपणे दिसून येतात. ‘संवाद’ हा या कवितेचा स्थायीभाव आहे. लौकिक आयुष्यातील व्यक्ती, घटना आणि प्रसंग त्यांच्या कवितेला विषय पुरवतात. व्यक्तींशी ते काव्यात्म संवाद साधतात तर घटना-प्रसंगांमधले काव्य नेमकेपणाने हेरून शब्दांत मांडतात. हे सगळे प्रकट होताना त्यांच्या जाणिवेच्या केंद्रस्थानी असणारी, वंचित-शोषित समूहाच्या जगण्यातील अभावग्रस्तता, नाडलेल्या- पिचलेल्या वर्गाच्या वेदनेची सल आणि सर्वहारांच्या दुःखाची झळ त्यांच्या शब्दात पाझरते, आशयाला सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आपसूकच बिलगतात आणि कवीची व्यक्तिगत अनुभूती समष्टीशी जोडली जाते. नामदेव ढसाळ आणि अरुण काळे यांचे ऋण व्यक्त करणारी ही कविता त्यांच्याच वाटेवरच्या समृद्ध प्रवासाचे आश्वासन देणारी आहे.
पुस्तकाची झलक