Offer
संस्कृतिसंचित
ISBN:
9789382364382
Status:
Out Of Stock
Price:
280/-
Author/Editor:
दुर्गा भागवत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
256
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
संस्कृतिसंचित लोकसाहित्य, मानववंशशास्त्र,समाजशास्त्र, धर्मविचार-विशेषत बौद्ध धर्म, परंपरा या साऱया अभ्यासविषयांमधील लेखनाबरोबरीनेच दुर्गाबाईंचे ललितलेखन होत गेले आहे. या साऱया गंभीर प्रकृतीच्या विषयांचा धांडोळा घेताघेताच मानवी जीवनाबद्दल जे जे जाणवत गेले, ते ते त्या आपल्या लेखनातून मांडत गेल्या. मग कधी त्या लेखनाचे स्वरूप स्वतजवळील संपादित ज्ञानाचे आकलन व अन्वय असे राहिले, कधी त्या अनुभवाने ललित रूप धारण केले, तर कधी केवळ संकलन करणे हेदेखील त्यांना महत्त्वाचे आणि आवश्यक वाटले. मानवी सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ö ती कितीही क्षुद्र असो, वा भव्य असो, öत्या गोष्टीला या सृष्टीच्या विराट पसाऱयात स्थान आहे आणि मानवी संस्कृतीच्या वाटचालीत या साऱयांचा सहभाग आहे हे त्यांनी जाणले होते, आणि वेळोवेळी त्यांनी ते आपल्या लेखनातून व्यक्तही केले... मानवी संस्कृतीची एकात्मता ही आपण सर्वांनी जाणून घ्यायची एक वस्तुस्थिती आहे, ते केवळ स्वप्न वा कल्पना नव्हे. या व्यापक समजुतीतूनच त्या लिहीत गेल्या. त्यामुळेच असेल, त्यांच्या मनात आणि म्हणून लेखनात कोणत्याही प्रकारचा ö धर्म, जाती, देश, परदेश, नागर, अनागर असा ö भेदभाव आपल्याला दिसत नाही. त्यांचे कुतूहल त्यांना सर्वत्र घेऊन जाते आणि आपल्याला माहीत झालेले सर्वांना सांगावे या आत्यंतिक ओढीने त्या सांगत जातात.
पुस्तकाची झलक