Offer
स्वयं प्रकाश : निवडक कथा
ISBN:
978-93-82364-59-7
Status:
Available
Price:
180/-
Author/Editor:
बलवंत जेऊरकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
143
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
स्वयं प्रकाश : निवडक कथा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक स्वयं प्रकाश यांच्या ‘दस प्रतिनिधि कहानियाँ’ या कथासंग्रहाचा हा अनुवाद. स्वयं प्रकाश हे हिंदीतील महत्त्वाचे आणि विलक्षण कथाकार आहेत. त्यांच्या एकूण कथांमध्ये काल्पनिक पात्रांची संख्या अत्यल्प स्वरूपात आहे. ज्यांच्या सोबत ती गोष्ट घडली आहे त्या व्यक्ती त्यांच्या कथांमधून व्यक्तिरेखा बनून वावरतात, त्यामुळे त्यांची कथा खळबळजनक होण्यापासून वाचते. त्यांच्या निवडक कथांच्या या संग्रहातून देशाची फाळणी, इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या जनप्रक्षोभात मारली गेलेली माणुसकी, कृषिजन संस्कृतीतील ऱ्हास पर्व, जागतिकीकरण, चळवळींची समाप्ती, राजकीय उलथापालथ यासोबतच एका स्त्रीची प्रसवपीडा यासारखे गुंतागुंतीचे व क्वचितच कथाविषय होण्याची शक्यता असणारे वर्तमान सशक्तपणे उतरवले आहे. हे अपवादात्मक म्हणावे लागते. त्यांच्या कथा त्या-त्या घटना-प्रसंगांचे अभूतपूर्व दस्तऐवज आहेत. पारंपरिक गोष्टींची नैसर्गिक सहजता हे त्यांच्या कथांचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. मराठी कथावाङ्मयाला आजवर अपरिचित असणाऱ्या अनुभवविश्वाची ओळख करून देणाऱ्या आणि वाचकाला आणि मराठी साहित्य विश्वाला समृद्ध करणाऱ्या या कथा आहेत. या कथा केवळ स्वयं प्रकाश यांच्याच नव्हे तर हिंदीतीलही महत्त्वाच्या कथा आहेत.
पुस्तकाची झलक