Offer
धूळपेर
ISBN:
9789382364580
Status:
Available
Price:
250/- 225/-
Author/Editor:
आसाराम लोमटे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
176
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
धूळपेर ...दररोज असंख्य नवनव्या उत्पादनांच्या जाहिराती येऊन आदळत आहेत. तणावमुक्त कसे जगायचे हे सांगणारे लोकही गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. ‘स्वास्थ्यकारक’ जगण्यासाठी वाट्टेल तितका पैसा मोजायला लोक तयार आहेत. अशा सगळ्या सुखासीन, आत्ममग्न जगात झोप उडवणारे, स्वास्थ्य हरवून टाकणारे काही ‘स्वास्थ्यहारक’ पुढ्यात आले तर कसे वाटेल? ...अंतर्मुख करणारे, कधी आतल्या आत स्वतःलाच तपासायला लावणारे, साचलेपणाला जरा खरवडून काढणारे, गोठलेल्या स्निग्धतेला वितळविणारे असे काही तरी पेरावे हा या लेखनामागचा उद्देश होता... अर्थात काही चांगले उगवून येण्यासाठीच. ...एका अर्थाने हे वंचितांचे वर्तमान आहे. ‘धूळपेर’ करताना माती कोरडी असते. पाऊस नक्कीच येईल हा आशावाद पेरणी करताना असतो. बियाणे जसे कोरड्या मातीत स्वतःला गाडून घेते आणि कधी तरी पडणाऱया पावसाच्या पाण्याने जी ओल निर्माण होईल त्यावर अंकुरण्याची उमेद बाळगते अगदी तशीच भावना सगळ्या वंचितांच्या जगण्याच्या बुडाशी असते... जरा डोळे उघडे ठेवले, वेदनेची भाषा समजून घेतली आणि एखाद्याच्या दुःखाची गाज ऐकण्यासाठी मनाची, आपल्या अर्थपूर्ण हस्तक्षेपाची तयारी ठेवली तरीही खूप झाले. संवेदनेच्या वाटेवरचे आपण सहप्रवासी आहोत कारण आपल्याला बांधणारा काळ एक आहे... - ‘धूळपेर’मधून
पुस्तकाची झलक